पिंपरी-चिंचवड बंदला राष्ट्रवादीचा पाठींबा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

उद्या गुरुवार क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याचा वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून पिंपरी-चिंचवडही बंद ठेवावे असे आवाहन केले आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराचा जाहीर पाठिंबा दिला असल्याचे घोषित केले आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0fbad2f0-9b2f-11e8-be46-7d8d8130fcca’]

मागील काळात बंद दरम्यान चाकण येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.  कोणत्याही प्रकारची तोडफोड, जाळपोळ यासारखे गैरप्रकार होणार नाहीत यासाठी सर्व शहरातील व्यापारी, दुकानदार, वाहतुकदार यांना नम्र विनंती करण्यात येते की, आपण सर्वानी स्वत:हून गुरुवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०१८ रोजी दिवसभर सर्व आपले व्यवहार / व्यवसाय बंद ठेवून महाराष्ट्र बंदला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा व इतर संघटना यांचे  दि.०९ ऑगस्ट २०१८ रोजीच्या आंदोलनाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये एक दिवस बंद ठेवण्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये व संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये दि. ०९ ऑगस्ट २०१८ रोजी एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी दिले आहेत. याबाबत संबधितांनी योग्य ती कार्यवाही करावी व या दिवशी अपूर्ण राहणारा अभ्यासक्रम सुट्टीच्या दिवशी पूर्ण करण्यात यावा असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.