ट्रेंच कोट, हाय बूट्स, एथनिक ज्वेलरी, पहा नीना गुप्तांच ‘फॅशन फ्युजन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नीना गुप्ता सध्या फॅशन गोल्स देताना दिसत आहे. प्रत्येकाला तिचा फॅशन सेसं फॉलो करायचं आहे असं दिसत आहे. सध्या नीनाचे अनेक फोटो समोर येताना दिसत आहेत जे व्हायरल होत आहेत. या फोटोत नीनाचा स्टनिंग अंदाज पहायला मिळत आहे.

नीनाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर नीनानं ट्रेंच कोट, हाय बूट्स आणि ओवर साईज शर्ट घातल्याचं दिसत आहे. यासोबतच तिनं एथनिक ज्वेलरी घातली आहे. नीनाच्या फॅशन फ्युजननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नीनानं तिचे हे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. नीनानं फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, “ट्रेंच कोट तर घातला, परंतु ज्वेलरी घातल्याची इच्छा आजही कायम आहे.”

नीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 1982 साली आलेल्या नजदीकिया या सिनेमातून तिनं आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर ती दो यारो, मंडी, त्रिकाल असे सिनेमे केले आहेत. नीनानं खानदान या सीरियलमधून अॅक्टींग करिअरला सुरुवात केली होती. तिनं सांस, सिस्की, सात फेरे, कमजोर कडी कौन यांसारख्या अनेक हिट मालिकेत काम केलं आहे. नीना बधाई हो सिनेमातही दिसली होती. नुकतीच ती पंगा सिनेमात झळकली होती.