Neera Crime News | मद्यधूंद चालकाचा रस्त्यावर थरार! प्रवाशांचा जीव मुठीत

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – Neera Crime News | मद्यपी एसटी चालकाने (Drunken ST Driver) स्वारगेट (Swargate) ते सांगोला (Sangola) बस मद्यपान करुन चालवल्याचे समोर आले आहे. चालकाने 62 किलोमीटरचे अंतर सुसाट वेगात बस पळवून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केला. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेट पासून बस नागमोडी चालू लागली. ट्रकचा कट बसल्याने बस रस्ता सोडून चालू लागल्याने प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर काही प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस थांबवण्यास (Neera Crime News) भाग पाडले.

 

याबाबत प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट-सांगोला बस दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकातून निघाली. बस स्थानका बाहेर येताच दुभाजकाला धडकली. मात्र, त्यावेळी काही जाणवले नाही. पुढचा प्रवास सुरु झाल्यानंतर बस सतत झोल मात होती. कधी वेग जास्त तर कधी रेस करत बस पळत होती. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे पासून बस नागमोडी चालू लागली. एका ठिकाणी तर बसने ट्रकला कट मारला. त्यानंतर बस डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरुन धावत होती. यामुळे चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. (Neera Crime News)

याच दरम्यान पुणे विभागाचे लाईन चेकर नीरा परिसरात होते.
त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय-32 रा. लातूर आगार, सांगोला)
याला ताब्यात घेत नीरा पोलीस ठाण्यातील (Neera Police Station) पोलिसांच्या ताब्यात दिले.
बस नीरा स्थानकात आणून दुसऱ्या बसमधून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पाठवून दिले.
ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी बसमध्ये 52 प्रवासी प्रवास करत होते.
प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले.

 

Web Title :- Neera Crime News | in pune drunken st drivers 62 km journey to swargate sangola went smoothly passengers lives in hand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू