दुर्लक्षीत पुणे-सोलापूर महामार्ग

थेऊर – पुणे सोलापूर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे आणि यावर संबंधित विभागाचा अधिकारी फिरकलाच की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण या महामार्गावर अनेक ठिकाणी काटेरी झुडूपांनी आपले बस्तान वाढवलेले आहे विशेषतः बोरकरवस्ती ओढ्यावरील पुलावर आणि लोणी काळभोर काॅर्नरवरील पुलावर याची संख्या मोठी आहे.

पुणे शहराला जोडणार्या सर्वच महामार्गांचे रुंदीकरण करण्यात आले बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर सन 2003 मध्ये पुणे सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले पहिल्या टप्प्यात कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी इथपर्यंत सत्ताविस कि.मी चा हा टप्पा पूर्ण झाला.

या महामार्गावर आय आर बी कंपनीकडून सन 2019 पर्यंत टोल वसूल करण्यात आला त्यानंतर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्यानंतर जवळपास दीड वर्ष उलटून गेले परंतु त्यानंतर या मार्गाची कसलीच देखभाल केलीच नाही असे चित्र आहे अनेक ठिकाणी दुभाजकाची उंची चिखलामुळे खुपच कमी झाल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत रस्ता ओलांडून पलिकडील रस्त्यावर वाहनांवर आढळत आहेत तसेच सर्वीस रस्त्यावर चिखलाचा खच आहे जाळ्या तुटल्या आहेत यावरुन याची देखभाल करण्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

प्रसिध्द उद्योजक योगेश काकडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की सध्या पुणे सोलापूर महामार्गाकडे सार्वजनीक बांधकाम खात्याचे खरोखर दूर्लक्ष झालेले दिसते कारण कुंजीरवाडी परिसरात रस्त्यावर चिखलाचे थर साचलेले आहेत अनेक ठिकाणी छोट्या झुडूपामुळे दुचाकी वाहन चालकाला वाहन चालवणे अवघड जाते याची त्वरीत देखभाल होणे आवश्यक आहे.

यावर सार्वजनीक बांधकाम खात्याचे अधिकारी देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यानी ही वस्तुस्थिती मान्य केली परंतु आठवडाभरात ही सर्व झुडूपे काढली जातील असे सांगितले.