नीरेत भरवस्तीत घरफोडी ; सव्वीस हजाराचा माल लंपास

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – नीरा (ता.पुरंदर) येथील बाजार तळाजवळ असलेल्या भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वीस हजाराचा माल लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद दिपक माणिकराव कोंडे यांनी निरा पोलिस क्षेत्रात दिली . भरवस्तीत झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा वार्ड नं २ , बाजारतळाजवळील भर वस्तीत राहत असलेले दिपक कोंडे हे आपल्या पत्नी मुलासह शनिवारी (दि.८ ) संध्याकाळी सहाच्या सुमारास कोंडेवाडी (कर्नलवाडी ) येथे आपल्या मुळगावी घराला कुलूप लावून गेले असता अज्ञान चोरट्याने घराचे कुलूप कोयंडा तोडून तसेच घरातील लोखंडी कपाट तोडून त्यातील दीड तोळ्याचे एक सोन्याचे मिनी गंठन , एक ग्राम सोन्याचा बदाम , एक ग्राम वजनाचे सोन्याचे झिरो मनी , एक चांदीचा करंडा असा २६ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला असल्याने नीरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास कामी सूचना दिल्या. नीरा पोलिस दूरक्षेत्राचे सहा. फौजदार बाळासाहेब बनकर पुढील तपास करीत आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित

दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम

औरंगाबादेतील कॅन्सर हॉस्पिटलची क्षमता वाढणार ; १०० खाटांचे रुग्णालय २६५ खाटांचे