नेपाळच्या ‘या’ महिला बॉलरनं तोडले सर्व ‘रेकॉर्ड’, एकही ‘रन’ न देता घेतल्या 6 ‘विकेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळची युवा क्रिकेट खेळाडू अंजली चंदने सोमवारी एक ही रन न देता सहा बळी घेत टी-२० इंटरनॅशनल मध्ये इतिहास रचला आहे. तिने हि कामगिरी पोखारा (काठमांडू) येथे चालू असलेल्या साऊथ आशियन गेम्समध्ये मालदीवविरुद्ध केली. अंजली टी -२० मधील महिला आणि पुरुषांमधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारी गोलंदाज बनली आहे.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेली मालदीवची टीम फक्त १६ रन बनवू शकली. हे लक्ष नेपाळने फक्त ०.५ ओव्हर मधे पूर्ण करत एक हाती सामना जिंकला.

२४ वर्षांच्या अंजलीने सातव्या ओव्हरमध्ये तीन विकेट्स आणि नवव्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यानंतर ११ व्या ओव्हरमध्येही एक विकेट्स झटकावत मालदीवच्या डावाचा शेवट केला. मध्यम गतीची गोलंदाजी करत अंजलीने पूर्ण मॅच मध्ये फक्त १३ चेंडू फेकले. तिने आपल्या शेवटच्या तीन चेंडूत तीन बळी घेत हॅट्रिक केली.

याबरोबरच अंजलीने महिला टी -२० इंटरनॅशनल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद आपल्या नावे केली आहे. याआधी मालदीवची मॅस इल्यसाने चीनच्या विरुद्ध याच वर्षी ३ रन देऊन ६ विकेट पटकावल्या होत्या.

पुरुष क्रिकेट टी-२० मध्ये सर्वश्रेष्ठ गोलंदाजीचे रेकॉर्ड दीपक चहरच्या नावे आहे. दीपक चहर ने १० नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध ३.२ ओव्हर मध्ये सात रन देऊन सहा विकेट आपल्या नावे केल्या होत्या.

Visit : policenama.com

You might also like