Netflix Free : कंपनीची घोषणा ! भारतात 2 दिवसांसाठी Netflix ‘विनामूल्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेटफ्लिक्स (Netflix) ने आपली सेवा भारतात दोन दिवसांसाठी विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. हे नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्ट (Netflix StreamFest) अंतर्गत केले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नेटफ्लिक्सच्या या स्ट्रीम फेस्टदरम्यान भारतातील कोणीही नेटफ्लिक्सचा प्रीमियम कंटेंट पाहू शकतो. यासाठी त्यांना पैसे द्यावे लागणार नाहीत. तथापि, यासाठी आपल्याला आपल्या ई मेल आयडी किंवा नंबरद्वारे साइनअप करावे लागेल.

नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसांकरिता सर्व वापरकर्त्यांकडे नेटफ्लिक्सच्या त्या सर्व फीचर्सचा अ‍ॅक्सेस असेल जो सध्या प्रीमियम वापरकर्त्यांना देण्यात येतो. तसेच साइन अप करण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डची डिटेल्स देणेदेखील आवश्यक नाही. नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्टअंतर्गत आपण विनामूल्य नेटफ्लिक्स पाहण्यासाठी (Netflix.com/StreamFest) वर भेट देऊ शकता. आपण अँड्रॉइड (Android) अ‍ॅपदेखील डाउनलोड करू शकता, आपल्याकडे आधीपासून खाते नसेल तर आपण साइन अप करू शकता.

आजपासून आपण (Netflix.com/StreamFest) वर जाऊन एक रिमाइंडर सेट करू शकता, जेणेकरून हे लाईव्ह होताच आपण विनामूल्य नेटफ्लिक्स पाहू शकता. कंपनीने असे म्हटले आहे की जे स्ट्रीम फेस्टदरम्यान साइन इन करतील त्यांना फक्त स्टॅण्डर्ड डेफिनेशनचे कंटेंट दिसू शकेल. कंपनीने असेही म्हटले आहे की नेटफ्लिक्स अकाउंटवरून स्मार्टफोन, टीव्ही, आयओएस डिव्हाइस, गेमिंग कन्सोल सर्वत्र कंटेंट पाहण्यास सक्षम असतील. हे स्मार्टफोनमधून टीव्हीवर कास्टदेखील केले जाऊ शकते.

भारतात 5 डिसेंबर रोजी 12.01 AM पासून नेटफ्लिक्स विनामूल्य दिसेल आणि ते 6 डिसेंबर रोजी रात्री 11.59 पर्यंत चालेल. कंपनीने म्हटले आहे की जर स्ट्रीम फेस्ट दरम्यान दर्शकांची संख्या मर्यादित राहिल्यास आणि जर यादरम्यान (StreamFest is at capacity)चा मेसेज दिसला तर आपणास हे सांगितले जाईल की आपण केव्हा स्ट्रीमिंग सुरू करू शकाल.