दिवाळीपूर्वी २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. आता दिवाळी पूर्वीच २० रुपयांची नवी नोट बाजारात येणार आहे.

त्यानुसार, सर्वप्रथम, ५०० आणि २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर, २०० रुपयांची, ५० रुपयांची, १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. आता, लवकरच २० रुपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून २० रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. या नोटांवर महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील अजंठा लेण्यांचे छायाचित्र असणार आहे. त्यामुळे २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्राला स्थान मिळणार असल्याचे दिसून येते. मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. जुन्या २० रुपयांच्या नोटेपेक्षा नवीन २० रुपयांची नोट आकाराने २० टक्के कमी असणार आहे. इतर नोटांप्रमाणेच २० रुपयांच्याही नोटेला अत्याधुनिक सुरक्षेसह बनविण्यात येत आहे. दरम्यान, २०१६ च्या आरबीआयच्या वार्षिक अहवालातच या नोटांमध्ये होणाºया बदलाचे संकेत देण्यात आले होते. या नोटेवरही स्वच्छ भारत मिशनचा लोगो असणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच भारतीयांना २० रुपयांच्या नव्या नोटेची खरेदी करता येणार आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dec08959-b322-11e8-b1f0-5d68b963751c’]