ताज्या बातम्या

New Chief Election Commissioner of India | भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – New Chief Election Commissioner of India | भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांची जागा घेतील. न्याय आणि कायदा मंत्रालयाने गुरुवारी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. (New Chief Election Commissioner of India)

 

 

14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. कायदा मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू (Union Minister Kiran Rijiju) यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.

 

Web Title :- Appointment of Rajiv Kumar as the new Chief Election Commissioner of India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button