निर्भया केस : ‘या’ 6 मोठ्या कारणामुळे टळू शकते 3 मार्चला दिली जाणारी ‘फाशी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भया प्रकरणात चारही दोषी (विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) यांना 3 मार्चला (मंगळवार) सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. आता यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. परंतु, ज्याप्रकारे निर्भयाचे दोषी कायद्याचे डावपेच खेळत आहेत, ते पाहिले तर त्यांना उद्या फाशी होईल असे वाटत नाही.

चारही दोषींमध्ये पवनकुमार गुप्ता एकमेव आहे, ज्याने आतापर्यंत सुधारित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली नव्हती, जी त्याने शुक्रवारी दाखल केली. अन्य तीन दोषी विनय, मुकेश आणि अक्षय यांचे फाशीपासून वाचण्याचे सर्व कायदेशीर पर्याय आता संपले आहेत. तरीही चारही दोषींनी मागच्या तीन दिवसात वापरलेले डावपेच पाहता 3 मार्चला होणार्‍या फाशीबाबत सांशकता वाटत आहे. जाणून घेऊयात ते 6 मुद्दे जे फाशीमध्ये अडचण ठरू शकतात.

1 दिल्ली कारागृह कायदा

दिल्ली जेल मॅन्युअलमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, जोपर्यंत आरोपीजवळ एकसुद्धा कायदेशीर पर्याय बाकी असेल, किंवा तो त्याचा वापर करत असेल तर त्यास फाशी देता येणार नाही. जर त्याची एखादी याचिका उदाहरणार्थ दया याचिका जरी फेटाळली, तरी त्याला फाशीपूर्वी 14 दिवसांचा वेळ दिला पाहिजे.

2 एकाच गुन्ह्यात एकत्र फाशी

एकाच गुन्ह्यात सर्व दोषींना एकाच वेळी शिक्षा देण्याची तरतूद आहे, परंतु याविरोधात केंद्र आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर पुढील 5 मार्चला सुनावणी होणार आहे. यामुळे 3 मार्चला होणारी फाशी यासाठी टळू शकते, कारण याचिका प्रलंबित आहे. दिल्ली आणि केंद्र सरकारच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने निर्णय दिला आहे की, चारही दोषींना एकाच वेळी फाशी होईल. यास केंद्र आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे, ज्यावर येत्या 5 मार्चला सुनावणी होणार आहे.

3 पवनच्या याचिकेचा अडथळा

चारही दोषींपैकी पवन कुमार गुप्ता याने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात फाशीपासून दिलासा मिळण्यासाठी सुधारित याचिका दाखल केली आहे, ज्यावर सोमवारी जस्टिस एनव्ही रमना यांच्या खंडपीठसमोर इन चेंबर सुनावणी होणार आहे. अन्य तीन दोषींची सुधारित याचिका कोर्टाने यापूर्वीच फेटाळली आहे. यामुळे पवनची याचिका सोमवारी जरी फेटाळली गेली तरी नियमानुसार 14 दिवसांनंतर फाशीची अंमलबजावणी करावी लागेल.

4 फाशी रोखण्याचा प्रयत्न, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

निर्भयाच्या दोषींना फाशीपासून वाचवण्यासाठी शनिवारी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यावर सुनावणीची तारीख अद्याप ठरलेली नाही. वकील एपी सिंह यांनी दाखल केलेल्या या याचिकेत चारही दोषींची मानसिक आणि शारीरीक स्थिती तपासण्याची विनंती केली आहे. याचिकेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला निर्देश देण्यासंदर्भात म्हटले आहे की, त्यांनी चारही दोषींची शारीरीक आणि मानसिक स्थितीची तपासणी करावी.

5 फाशी थांबवण्यासाठी याचिका

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टमध्ये दोषी अक्षय सिंह आणि पवन गुप्ता यांनी डेथ वॉरंटवर रोखण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर अ‍ॅडिशनल सेशन जज धर्मेंद्र राणा यांनी तिहार जेल प्रशासनाकडून 2 मार्चपर्यंत उत्तर मागितले आहे. दाखल याचिकेमध्ये अक्षयने दावा केला आहे की, राष्ट्रपतींच्या समोर त्याची नवी याचिका प्रलंबित आहे. तर, पवनने सुधारित याचिकेचा हवाला दिला आहे. यामुळे 3 मार्चच्या फाशीबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

6 निर्भयाच्या दोषींवर लूटमारीचे केससुद्धा

राम आधार नावाच्या व्यक्तीकडून राम सिंह (2013 मध्ये तिहार जेलमध्ये ज्याने आत्महत्या केली होती), मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय ठाकुर आणि अल्पवयीन लूटमार केली होती. लूटमारीच्या या प्रकरणात 2015 मध्ये निर्भयाचे चारही दोषी विनय, पवन, अक्षय आणि मुकेश यांना पटियाला हाऊस कोर्टाने 10 वर्षाची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणात दोषींचे वकील एपी सिंह यांचे म्हणणे आहे की, दिल्ली हायकोर्टमध्ये शिक्षेला आव्हान देण्यात आले आहे आणि हे प्रकरण अजून प्रलंबित आहे. यामुळे जोपर्यंत या प्रकरणी निर्णय येत नाही, तोपर्यंत, फाशी होऊ शकत नाही.