तिहेरी तलाक कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली : ऐतिहासिक तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाली आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊन काहीच कालावधी झाला तोच आता या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तीन तलाक कायद्याला आव्हान देणाऱ्या दोन वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. केरळमधील एका मुस्लिम संघटनेने सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे तर एका वकिलाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

तीन तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर ३१ जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. राष्ट्रपतींनी सही करताच या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले असून या कायद्याला लगेचच आव्हान देण्यात आले आहे.

मुस्लिम महिला (महिला अधिकार संरक्षण कायदा) कायदा, २०१९ हा मुस्लिम पतीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. केरळमधील समस्त केरळ जमीथुल उलेमा या संघटनेने सुप्रीम कोर्टात तर अ‍ॅड. शाहिद अली यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त