Pune Pimpri Chinchwad Crime News | खासगी सावकाराच्या त्रासाला वैतागून तरुणाची आत्महत्या, सोमवार पेठेतील घटना; महिलेसह दोघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | खासगी सावकाराकडून (Money Lenders) होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून एका तरुणाने आत्महत्या केल्याची (Committed Suicide) घटना सोमवार पेठेत घडली आहे. तरुणाला धमकावून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Pune Police) दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दीपक चंपालाल राजपुरोहित Deepak Champalal Rajpurohit (रा. सोमवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत चंपालाल पुखराज राजपुरोहित यांनी शनिवारी (दि.30) समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रियंका जगताप व फिलीप डिसुजा (दोघे रा. सोमवार पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 306, 304 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक याने राहत्या घरातील हॉलमध्ये असलेल्या सिलिंग फॅनच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. यानंतर शनिवारी दीपकच्या वडीलांनी फिर्याद दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी यांचा मुलगा दीपक याने आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याची वेळेत परतफेड करता आली नाही. त्यामुळे बेकायदा सावकारी करणाऱ्या आरोपींनी दीपक याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. तसेच आरोपींनी मानसिक त्रास देऊन धमकावले होते.
सावकारांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून दीपक याने 15 डिसेंबर रोजी
गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे (PSI Jyoti Kutte) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुलाला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार, येरवडा परिसरातील घटना; दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, पुणे कॅम्प परिसरातील घटना

ब्युटी पार्लरमध्ये महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR; हडपसर परिसरातील प्रकार

तरुणीची छेड काढून आईला बेल्टने मारहाण, वडगाव शेरी परिसरातील घटना

नातवाकडून आजीला दगडाने मारहाण; धनकवडीमधील घटना

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक; वडगाव शेरी परिसरातील घटना

ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित