फोनमध्ये ‘हे’ अ‍ॅप असल्यास भरावा लागणार नाही ‘दंड’, ‘DL’ सोबत बाळगण्याची गरज ‘नाही’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून वाहतूक उल्लंघनाच्या दंडाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. राज्यात हे नियम सोमवारपासून लागू झाले आहे. कारण सॉफ्टवेअर अपडेट नव्हते. आता तुम्हाला वाहतूकीचे नियम मोडल्यास भरघोस दंडाला समोरे जावे लागेल. परंतू तुमच्याकडे एक मोबाइल अ‍ॅप असेल तर तुम्ही या दंडापासून वाचू शकतात.

मागील वर्षी परिवहन मंत्रालयाने आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत सांगितले आहे की, वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि वाहन विम्याच्या कागदपत्रांची ओरिजन प्रत तपासणीसाठी घेऊ नये.

डिजीलॉकरवर ठेवा तुमची कागदपत्र
मंत्रालयाने सांगितले की, डिजीलॉकर आणि एम परिवहन या अ‍ॅपवर असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉपीला वैध मानण्यात येईल. केंद्र सरकारने या संबंधित माहिती वाहतूक पोलिसांना कळवली आहे की त्या तपासणीसाठी खरी कागदपत्र मागू नये. वाहतूक पोलीस आता मोबाइलमधून ड्रायवरचे वाहतूकीसंबंधित माहिती क्यूआरच्या माध्यमातून मिळवू शकतात आणि वाहन चालकाद्वारे होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे देखील रेकॉर्ड ठेवण्यात येईल.

ही आहे प्रक्रिया –
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मोबाइलमध्ये पहिल्यांदा डिजीलॉकर आणि एम परिवहन अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यात तुम्हाला साइनअप केल्यावर मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यात ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला वेरिफाय केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात लॉगिन केल्यावर आपला यूजर नेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल. यावर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचे आधार मान्य करण्यात येईल.

त्या तुम्ही डिजीलॉकर तुम्ही आरसी, वाहन परवाना आणि विम्याची कॉपी डाऊनलोड करु शकतात आणि पोलिसांना दाखवू शकतात. एम परिवहन अ‍ॅपमध्ये गाडी मालकाचे नाव, नोंदणी तारीख, मॉडेल नंबर, विम्याची वैधता इत्यादी सर्व माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्हाला खरी कागदपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –