home page top 1

‘रंगेल’ पोलिस उपनिरीक्षकामुळे खात्याची ‘बदनामी’ ; ऑन ड्युटी ‘छमछम’मध्ये काढले बारबालांचे फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत एका पोलीस उपनिरीक्षकाच्या रंगेल प्रतापामुळे पोलीस खात्याला मान खाली घालायला लावली आहे. कायद्याचे रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसाचा प्रताप वर्दीला लाज आणणारा आहे. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे याने ड्युटीवर असताना डान्स बारमध्ये बसून बारबालांचे फोटो काढताना व्हिडीओमध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
mumbai-police

मुंबईतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्य़रत असणाऱे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे यांची ड्युटी डान्स बार जवळ लावण्यात आली होती. कर्तव्यावर असताना बनसोडे याने डान्स बारमध्ये बसून त्याठिकाणी नृत्य करणाऱ्या बारबालांचे फोटो काढले. बारबालांचे फोटो काढताना बनसोडे व्हिडीओत कैद झाला. ऑन ड्युटी असताना डान्स बारमध्ये बसून बारबालांचे फोटो काढणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकामुळे पोलीस दलाची मान खाली घालायला लावणारी आहे. कायद्याचे रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसाचा प्रताप लाज आणणारा आहे.

ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना डान्स बारमध्ये जाण्यास परवानगी नाही. असे असतानाही बनसोडे डान्स बारमध्ये गेला. बारमधील एका सोफ्यावर बसून त्याने फोटो काढले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे याने ऑन ड्युटी डान्सबारमध्ये जाऊन कायद्याचीच लख्तर वेशीला टांगली आहेत. बनसोडे यांचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांकडे आल्याने हा प्रकार उघडकीस आला. मात्र, बनसोडे हे एकटेच डान्स बारमध्ये जातात असे नाहीत तर रात्री दहा नंतर अनेक पोलीस डान्स बारमध्ये जाऊन छम छमचा आनंद घेतात. सध्यातरी बनसोडे हेच बारमध्ये गेल्याचे समोर आले आहेत. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी बनसोडे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकारमुळे रात्रीच्यावेळी ऑन ड्युटी डान्स बारमध्ये जाणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
म्हणून ३५ वयानंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ तपासण्या
जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?
किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

Loading...
You might also like