७ वा वेतन आयोग : ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा होणार पगारासह २१ हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण करत नसताना, दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना एक खास गिफ्ट दिेले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयांचा परिणाम असा होईल की कर्मचाऱ्यांना ५००० रुपयांपासून ते २० हजार रुपये वर्षाला आधिक वेतन मिळणार आहे. रेल्वे विभागाकडून या संदर्भात एक सूचना पत्र देखील जारी केले आहे.

एकीकडे केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत नसताना आता मात्र रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना पगारात ५ ते २० हजार रुपयांनी वाढ केली आहे. रेल्वेकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना यासाठी भत्ते देण्यात आले आहेत.

रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले आहेत की हे भत्ते २०१७ पासून कर्मचाऱ्यांना देण्यात येते आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारे यूनिफॉर्म भत्ता, धुलाई भत्ता, शू अलाऊंस. किट मेन्टेनेंस अलाऊंस बरोबर सर्व भत्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. बोर्डाने सांगितले की प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे भत्ते एकदम देण्यात येणार आहेत. याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेने सांगितल्या प्रमाणे यात नर्स स्टाफला सोडून बाकी कर्मचाऱ्यांना एकत्र भत्ते देण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी संघटना बऱ्याच काळापासून भत्यांची मागणी करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे भत्ते त्यांच्या पगारातील भाग आहे. रेल्वे बोर्डाच्या मते ज्या कर्मचाऱ्यांना यूनिफॉर्म अनिवार्य आहे, त्यांना कामावर असताना हा युनिफॉर्म घालणे आवश्यक आहे.

Loading...
You might also like