अहमदनगर : जिल्ह्यातील आमदार राष्ट्रवादीतच, जिल्हाध्यक्ष फाळकेंचा दावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व सहाही आमदार हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामागे असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. जिल्ह्यातील पक्षाचे बहुतांशी आमदार हे सायंकाळी होत असलेल्या वायबीसी सेंटरमधील बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, निलेश लंके, संग्राम जगताप, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, डॉ किरण लहामटे हे सर्वजण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याच बाजूने आहेत. सर्व आमदार वायबीसीटी सेंटरमध्ये जमा झाले आहेत, असेही फाळके यांनी सांगितले.

आजच राष्ट्रवादीतील काही आमदार फुटल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील काही आमदारांबाबत संशय व्यक्त केला जात होता. मात्र सर्वच आमदारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील एकही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने नाही.

Visit : Policenama.com