बारामतीत खुनी हल्ल्यात चेहरा विद्रूप करण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – खून प्रकरणात आरोपी असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. हल्लेखोराने तिच्या चेहऱ्यावर वार करुन तो विद्रुप करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

काय घडले होते ?
ही मुलगी कृष्णा जाधव खून प्रकरणात आरोपी आहे. सोमवारी रात्री ही मुलगी शहरातील सांस्कृतिक भवनासमोरून निघाली होती. या वेळी अचानक आलेल्या हल्लेखोराने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला चढविला. त्यांनतर हल्लेखोर पसार झाला. याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पोलिसांनी तातडीने जखमी अल्पवयीन मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी रुग्णालयात जखमी मुलीची भेट घेतली होती. मात्र ससून रुग्णालयात उपचारादरम्यान आज सायंकाळी तीचा मृत्यू झाला.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like