गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रुझरला भीषण अपघात, ९ ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गोव्यात होळी साजरी करून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रूझरला कंटेनरची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज पहाटे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात सिंदगी येथे राष्ट्रीय महामार्गावर झाला. जखमींना सिंदगीच्या खासगी रुग्णालायात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

होळीच्या सुट्टीनिमित्त हे पर्यटक गोव्याला गेले होते. गोव्याहून होळी साजरी करून परतत असताना त्यांच्या क्रुझर गाडी आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसली. विजापूरहून आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या कंटेनर आणि क्रुझरची धडक एवढी भीषण होती. की क्रुझरमधील ९ जण जागीच ठार झाले. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना याची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना सिंदगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रकृती चिंताजनक असलेल्या जखमींना पुढील उपचारासाठी विजापूर आणि सोलापूरला रवाना करण्यात आले आहे. पोलीसांकडून मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.