दुर्देवी ! तिघांपैकी एकाचा सेल्फीच्या नादात कुंडमळ्यात बुडून मृत्यू

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. मावळातील वातावरण आणि परिसरामुळे अनेक पर्य़टक पावसाळ्यात पर्य़टनासाठी मावळमध्ये येत आहेत. आज सकाळी तळेगाव येथील कुंडमळा येथे फिरण्यासाठी आलेल्या तिघा मित्रांपैकी एकजण सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.

सौरव कळगे (वय १८ रा. चाकण) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरफच्या जवानांना तात्काळ या ठिकाणी पाचारण करण्यात आले. सायंकाळपर्य़ंत सौरभचा शोध घेण्यात आला मात्र, तो सापडला नाही. अंधार पडल्याने एनडीआरफच्या जवानांनी शोधकार्य़ थांबवले असून उद्या पुन्हा शोध सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सौरभ आणि त्याचे इतर दोन मित्र आज सकाळी आठच्या सुमारास कुंडमळा येथे वर्षाविहार करण्यासाठी आला होता. मित्रांसोबत त्याने फोटो काढेल. त्याला सेल्फीचा मोह न आवरल्याने तो कुंडामध्ये खाली उतरला. सेल्फी घेत असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पाण्यात बुडाला.

त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केला मात्र, पाणी जास्त असल्याने त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. या ठिकाणच्या नागरिकांनी याची माहिती एनडीआरएफला देण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी सौरवचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –