दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा, दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘दुष्काळाच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. सरकार दुष्काळावर काय उपाययोजना करतंय हे तर स्पष्ट सांगतच नाही पण कोर्टात साधी हजेरीही लावत नाही. इतके गांभीर्य दाखवण्याची मानसिकताही सरकारमध्ये नाही. एग्झिट पोलच्या विजयाचा जल्लोष झाला असेल तर दुष्काळाकडे वळा’ असं त्यांनी म्हंटल आहे.

लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच एक्झिट पोल जाहीर झाले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेवर येणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जागा २०१४ पेक्षा वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

You might also like