पी. चिदंबरम परदेशात ‘गायब’ होण्याची भिती, EDकडून ‘लुकआऊट’ नोटीस जारी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएक्स मीडिया संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळालेला नाही.

सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकपुर्व जामीनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याकडे पाठविले. त्यामुळे पी. चिदंबरम यांचे भवितव्य गोगई यांच्या हातात आहे. दरम्यान, पी. चिदंबरम हे देश सोडून जाण्याची शक्यता असल्याने ईडीने त्यांच्याविरूध्द लुकआऊट नोटिस जोरी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी पी. चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याकडे पाठविली आहे.

पी. चिदंबरम यांच्यावतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, सलमा खुर्शीद यांनी याचिका दाखल केली होती. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला होता. त्यानंतर तात्काळ सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या घरी जाऊन धडकले होते. तेव्हपासून ते बेपत्ता आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला न दिल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

ईडीनं लुकआऊट नोटीस काढल्यानं काँग्रेस पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे. काँग्रेसच्या एखाद्या मोठया नेत्याविरूध्द लुकआऊट नोटीस जारी होण्याची ही अलिकडील काळातील पहिलीच वेळ आहे. देशाच्या माजी अर्थमंत्र्यांविरूध्द लुकआऊट नोटीस निघाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.