धक्कादायक ! अ‍ॅसिड तोंडावर टाकण्याची धमकी देत विनयभंग, मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – रस्त्यावर महिला, तरुणीची छेडछाड आणि अ‍ॅसिड तोंडावर टाकण्याच्या धमक्या यामुळे पालक आणि तरुणी नेहमीच घाबरलेल्या असतात. असाच एक धक्कादायक प्रकार सांगवी येथे घडला आहे. नाव आणि मोबाईल नंबर देण्यास तसेच घरी येण्यास नकार देणाऱ्या एका तरुणीच्या तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत तिचा विनयभंग आणि मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली असून तेजस कमलाकर गायकवाड (25, रा. जूनी सांगवी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जय मालानगर येथे असताना तेजस तेथे आला. तुझे नाव आणि मोबाईल नंबर दे असे म्हणाला. त्या तरुणीने नकार दिला असता घरी येण्यास जबरदस्ती केली. माझ्याजवळ अ‍ॅसिडची बाटली आहे नाही आल्यास तोंडावर फेकून देतो अशी धमकी देत तरुणीला त्याच्या घरी नेले.

घरी नेवून तिचा विनयभंग केला. तसेच मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने काठिने मारहाण करुन जखमी केले. तपास सांगवी पोलिस करत आहेत.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like