शासकीय अधिकार्‍यांनी हेलपाटे होतील असे काम करू नये : आमदार अशोक पवार

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या सेवाहमी कायद्यानुसार शासकीय कार्यालयात
सर्व नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना हेलपाटे होतील असे काम करू नये व कामात दिरंगाई करू नये. अशी सूचना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केली.

शिरूर येथे तहसीलदार कार्यालय प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात
आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या शासकीय कार्यालयातील कामांची होणारी अडचण सोडविन्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभागाच्या शासकीय अधिकार्‍यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवला होता.

ashok pawar

यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, तहसीलदार लैला शेख , गट विकास अधिकारी विजय नलावडे, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र कुमार राऊत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, वीज वितरण कंपनीचे हितेंद्र भिरुड, नितिन महाजन, भगवान विधाटे, भुमी अभिलेख अधिक्षक व्ही. व्ही .ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे एम .आर. सोनवणे, जिल्हा परिषद उपअभियंता महेद्र कोठारे, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस संतोष भंडारी, तालुकाध्यक्ष रवी काळे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रवींद्र खांडरे,रंजन झांबरे, महिला शहराध्यक्ष पल्लवी शहा, माजी जाकिर पठाण, शिरुर नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, शहर मुस्लिम जमातचे शहराध्‍यक्ष ईकबाल भाई सौदागर, मनसेचे संदीप कडेकर, स्वप्नील माळवे, यासह सर्व तालुक्यातील शासकीय अधिकारी, नागरिक,महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयात होणाऱ्या अडचणींचा विचार करता आमदार अशोक पवार यांनी तालुक्यातील वीज मंडळ, महसूल विभाग, वनविभाग, परिवहन मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ,पोलीस प्रशासन, भूमिअभिलेख अशा वेगळ्या खात्यातील नागरिकांना होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व त्याबाबत अधिकाऱ्यांना नागरिकांची कामे जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आज शिरूर येथे आमदार अशोक पवार यांनी घेतलेल्या जनता दरबारात तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या शासन दरबारी होत असलेल्या अडचणी मांडल्या.
तालुका प्रशासनाच्यावतीने तहसीलदार लैला शेख यांनी आमदार अशोक पवार यांचा सत्कार केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/