जिजाऊ स्कुल विद्यार्थ्यांसाठी भावी आयुष्याची शिदोरीच : अल्पना वैद्य.

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – जिजाऊ स्कूलचा परिसर पाहून आपन भारावून गेलो. येथील इकोफ्रेंन्डली निसर्गरम्य परिसर पाहून ताण तणाव म्हणजे काय हेच मी इथे आल्यावर विसरून गेले विद्यार्थ्यांना भावी आयुष्य उज्वल करण्यासाठी हे स्कूल म्हणजे एक प्रकारे आयुष्याची शिदोरीच ठरेल. असे मत पूणे रोटरी क्लबच्या अध्यक्षा डाॅ. अल्पना वैद्य यांनी कालठण नं.१ येथे बोलताना व्यक्त केले.

त्या बोलताना पुढे म्हणाल्या की पालकांनी आपल्या पाल्या विषयी जागरूक असले पाहिजे. “पालकांना आपल्या मुलांचा भविष्यकाळ ऊज्वल, वैभवशाली आणि सम्रुध्द असावा असे वाटत असेल, तर त्यानी शिक्षणाचे महत्त्व नीट समजून घेणे आवश्यक आहे कारण भविष्यकाळ घडविण्यासाठी शिक्षणाचे धडे शिकविणारी शाळा देखील महत्वाची ठरते असे मत व्यक्त केले. जिजाऊ इन्स्टिट्युट इंग्लिश मिडीयम स्कूल, जूनियर कॉलेज कालठन नं.१, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने डॉ बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला अंतर्गत डॉ. अल्पना वैद्य यांचे ताण तणाव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्राचार्या राजश्री जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रा.सागर उंबरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शेखर साळवे, प्रा.प्रियंका देवकर, प्रा. आसिया शेख, प्रा.ज्योती कड़वळे, प्रा.अर्चना शिंदे यांनी सहकार्य केले. प्रा.सुहास शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी