जेजुरीतून पुरग्रस्तांना मदतीचा हात

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) – पूरग्रस्तांना मदत म्हणून तीर्थक्षेत्र जेजुरी येथील इरा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि पालक एकत्र येत सुमारे एक लाख रुपयांची मदत गोळा केली आहे. यामध्ये जेजुरी पोलीस स्टेशन, देवलीला प्रतिष्ठान आणि जेजुरी पोलिसांनी सहभाग घेतला.

इरा स्कूलचे विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सुमारे एक लाख रुपयांचे जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. पूरग्रस्तांना मदत करता यावी  या हेतूने जेजुरी येथील इरा स्कूलच्या वतीने विद्यार्थी व पालकांना मदतीचे आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेतील विद्यार्थी, पालकांनी आणि नागरिकांनी आटा, तेल, साबण, खाद्य पदार्थ, बिस्किटे, कपडे, पाण्याच्या बाटल्या आदी जीवनावश्यक वस्तू शाळेत जमा केल्या सुमारे एक लाखाहून अधिक रकमेच्या जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना पाठवण्यात आल्या. देवलीला प्रतिष्ठान, इरा इंग्लिश स्कूल, जेजुरी पोलीस स्टेशन व नागरिकांनी याबाबत पुढाकार घेतला.

जीवनावश्यक वस्तू प्रदान करताना जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, विजय वाघमारे, विठ्ठल सोनवणे, ॲड. सतीश राणे, प्रकाश लोंढे, संदीप कारंडे, रोहित टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त