धक्कादायक ! ‘पूरग्रस्त अन् पूरबाधित’ लालफितीत, ‘अनुदान’ वाटपानंतर पोलिस बंदोबस्तात ‘वसुली’, गावकरी ‘संतप्त’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाच्या ‘लालफिती’ चा कारभार कसा असतो, याचा कटू अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावातील पूरग्रस्तांना घ्यावा लागला आहे.गाव शंभर टक्के पूरग्रस्त असतानाही केवळ पूरग्रस्त आणि पुरबाधित या शब्दांचा घोळ घालत प्रशासनाने पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान म्हणून वाटप केलेली पाच हजारांची रक्कम पोलीस बंदोबस्तात पुन्हा ‘वसूल ‘ केल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

रांगोळी गावात पूरग्रस्तांना दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल करण्याचा प्रकार घडला आहे. पूरग्रस्त कोण हेच प्रशासनाला समजले नसल्याने घडलेल्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे.महापुराचा फटका हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यानंतर १०० टक्के गाव पूरग्रस्त घोषित करत सर्वाना ५ हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

मात्र त्यानंतर पूरग्रस्त आणि पूरबाधित या शब्दरचनेत प्रशासन अडकल्याने हे पैसे पुन्हा वसूल करण्यात आले. मात्र हे करत असताना पोलीस येऊन वसुली झाल्याने नागरिक संतप्त आहेत. प्रशासनाने सर्वेक्षण न करता ही मदत दिल्याने गोंधळ उडाल्याची चूक कबूल केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून मग मदत देऊ असे उत्तर सरकारी अधिकारी देत आहेत. त्यामुळे पुराच्या नावाखाली कोण रक्कम हडपणार असा सवाल ग्रामस्थ करीत असून प्रशासनाच्या हा अनागोंदी कारभाराचा निषेधही केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त