कोंढवा दुर्घटना : ‘त्या’ कामगारांची नोंदणी झाली नसल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम कामगारांची कामगार मंडळाकडे नोंद नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

याबाबत कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले की, मजुरांची नोंदणी का झाली नाही याची चौकशी केली जाईल. विशेष बाब म्हणून त्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून बांधकाम व्यावसायिकांना सक्त सूचना देण्यात येणार आहे.

कोंढवा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून ही मदत दिली जाणार आहे.
या दुर्घटनेत काही मुजरांचे संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडले असल्याने त्यांना मदत कशी देणार असा प्रश्न आता प्रशासना पुढे निर्माण झाला आहे. या ठिकाणी ३० झोपड्या होत्या. त्यापैकी ८ झोपड्यांवर ही भिंत कोसळली. मात्र, या घटनेनंतर इतर झोपड्यांमधील मजूर आपले सामान तेथेच सोडून भितीने घाबरुन पळून गेले आहेत. या मजूरांना शोधण्याची व मृत्यु पावलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरु आहे. या दुर्घटनेत बचावलेले अलोक शर्मा यांच्यामार्फत ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन