भारतीय जनतेने फकीराची झोळी भरली : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथिल भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “स्वतः मेघराजा सुद्धा विजयोत्सवात सहभागी झाले. असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच या भारताच्या तमाम जनतेने या फकिराची झोळी भरली अशी प्रतीक्रिया मोदींनी दिली.

हा विजय जनतेचा

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, आजच्या या लढतीत जर कोणी विजयी झाले असेल तर जनता आणि लोकशाही विजयी झाली आहे. त्यामुळे आजच्या या विजयाचे श्रेय पूर्णपणे जनतेला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सर्व विजयी उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनतेला ‘सर झुकाके नमन करता हू’ असे म्हणत जनतेचे आभार मानले.

केंद्र सरकार जनतेसाठी काम करेल

यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला की केंद्र सरकार जनतेसाठी काम करेल. विजयाचा हा आकडा म्हणजे इतिहासातली सर्वात मोठी घटना असल्याचे मोदी म्हणाले. यावेळी लोकसभा यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले तसेच त्यांचा गौरव आपल्या भाषणामधून केला.

जनता कृष्णाच्या रूपाने पाठीशी उभी राहिली

यंदाच्या निवडणुकीची तुलना त्यांनी महाभारताशी केली. तसेच हे २१ व्या शतकातील हे महाभारत असून यात श्री कृष्णाची भूमिका जनतेने केली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतीय जनता भारतासाठी श्रीकृष्णाच्या रूपाने उभी राहिली असे मोदी म्हणाले.