धक्कादायक ! दीड वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – झोपेत असल्याचा गैरफायदा घेत 32 वर्षीय ओळखीच्या नराधमाने दिड वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे घडली.

या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर अजय सुभाष खुणे (32, रा. भोसरी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री पीडित चिमुकली झोपली होती. त्यावेळी नराधमाने चिमुकली सोबत लैंगिक अत्याचार करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पालकांना माहिती झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास भोसरी पोलिस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like