इंदापूर : विकास कामांसाठी जि.प.कडून एक कोटीचा निधी मंजूर, प्रविण मानेंनी दिली माहिती

दापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – पुणे जिल्हा परिषद बांधकाम (दक्षिण) विभागाच्या माध्यमातून शासन निधी लेखाशिर्ष गट (अ) अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी इंदापूर तालुक्याच्या ग्रामिण भागातील वार्षिक रस्ते दुरूस्तीची तीन कामे मंजूर झाली असुन त्यासाठी ४५ लाख रूपये निधी मंजूर झालेला आहे. तर पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी ५६ लाख रूपये निधीतून ८ कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहीती पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.

यामध्ये इंदापूर-माळवाडी नं.२ ते बेंदवस्ती रस्ता (पाटील बंगला ते बेंदवस्ती) ग्रा.मा.५२, (१५ लाख),  इंदापूर-मोरे वस्ती ते जगदाळे वस्ती (तांबखडा ते मोरे घर)ग्रा.मा.१५८, (१५ लाख), गोतोंडी ते निमजाई रस्ता दुरूस्ती ग्रा.मा.९६, (१५लाख) वार्षिक रस्ता दुरूस्तीची वरील एकूण तीन कामे मंजूर झालेली असुन त्यासाठी ४५ लाख रूपये निधी मंजुर करण्यात आला आहे.

तर जिल्हा परिषदेच्या स्थिनिक विकास कार्यक्रम निधीतून डाळज नं.१ येथील पीरसाहेब पेव्हींग ब्लाॅक बसविणे (८लाख), हिंगणगाव येथिल पाटीलवस्ती रस्ता व पूल (१०लाख ), पंधारवाडी भवानीमाता मंदीर सभामंडप बांधकाम (५ लाख ), जक्शंन-आनंदनगर व्यायामशाळा इमारत (५ लाख ), सराफवाडी ते आमराईवस्ती मारूती मंदीर सभामंडप (५ लाख), सराफवाडी ते आमराई रस्ता दुरूस्ती (३ लाख),सणसर थोरात घर ते नितिन कदम घर रस्ता (१० लाख), भिगवण वाकसे घर ते अष्टविनायक चौक रस्ता (१० लाख) असा एकूण आठ कामांसाठी ५६ लाख रूपये निधी मंजुर झालेला असुन एकूण एक कोटी, एक लाख रूपये निधी मंजूर झालेला आहे.

जिल्हा परिषदेकडे सध्या निधीच्या उपलब्धतेबाबतची कमतरता असताना देखील इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक कोटी, एक लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला असुन तालुक्यातील ग्रामपंचायती व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार वरिल कामे मंजूर झालेली आहेत.वरिल सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्या त्या भागातील नागरिकांनी ठेकेदार करत असलेल्या कामावर लक्ष देवून त्या त्या भागातील कामे पारदर्शक करून घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविन माने यांनी केले आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like