मुख्यमंत्री शिवसेनेचाच, महाराष्ट्रात आपलं सरकार बनणार, आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. आपण अजुनही युती तोडलेली नाही असं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे देखील त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असेही त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात आपलं सरकार बनणार असल्याचे ठाकरे यांनी आमदारांच्या झालेल्या बैठकीत सांगितले आहे. दरम्यान, राज्यपालांनी कालच (शनिवार) सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यावर भाजपाचा अद्याप निर्णय झालेला नाही. भाजपा आज (रविवारी) दुपारी चार वाजता कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. त्यामुळे भाजपा शिवसेनेला सोबत घेवुन सत्तास्थापन करणार की आणखी काय करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यान, जयपुर येथे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. सत्तास्थापनेचा पेच आज सुटणार की आणखी काही दिवस महाराष्ट्राला वाट पहायला लावणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Visit : Policenama.com