वंचितकडून काँग्रेसला ’50 – 50′ ची ऑफर !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना देखील सोबत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नवीन फॉर्म्युला तयार केला होता. यामध्ये काँग्रेस 96, राष्ट्रवादी काँग्रेस 96 आणि वंचित बहुजन आघाडीने 96 जागांवर निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांनी वंचितसह राष्ट्रवादी काँग्रेसला दिली होती. मात्र हि ऑफर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी धुडकावून लावली होती.

त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला एक नवीन ऑफर दिली असून यामध्ये त्यांनी 50-50 या फॉर्म्युल्याचा अवलंब केला असून काँग्रेसने 144 जागा लढवाव्यात तसेच वंचित 144 जागा लढवेल अशी ऑफर त्यांनी काँग्रेसला दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता काँग्रेस यावर काय निर्णय घेते हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नको असून फक्त काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्येच हि चर्चा व्हावी अशी प्रकाश आंबेडकर यांची इच्छा असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता हे जागावाटप रंजक ठरणार आहे.

जागा खेचण्याचे प्रयत्न
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आतापर्यंत अनेक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत किती आमदार पक्ष सोडून जातात यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे गणित अवलंबून असल्यामुळे प्रकाश आंबेडकर जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like