जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग ; महत्वाची कागदपत्रे, रेकाॅर्ड जळून खाक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला मध्यरात्री एक वाजता लागलेल्या आगीत बँकेतील सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहे.

यवतमाळ येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या मुख्य शाखेत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील खाती, शेती विभाग, महत्वाची कागदपत्रे, रेकॉर्ड ठेवण्यात आले होते. या बँकेला मध्यरात्री एक वाजता अचानक आग लागली. त्यात अकाउंट्स आणि शेती विभाग जाळून खाक झाले. बँकेतील महत्वाची कागदपत्रे, रेकॉर्ड आगीत बेचिराख झाले आहे.

त्यामुळे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील लाखो खातेदारांविषयीची माहिती जळून गेल्याने बँकेसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही़.

Loading...
You might also like