‘या’ दोन रेल्वेला ‘चालवणार’ खासगी कंपन्या, तिकीट मात्र रेल्वेच ठरवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस या रेल्वे आता खासगी कंपन्यांच्या हातात सोपवल्या जाऊ शकतात. रेल्वे मंत्रालय यासंबंधित योजना तयार करत आहे. प्रवाशांचा चांगल्या सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे. यामुळे रेल्वेचा खर्च देखील कमी होईल आणि यामुळे प्रवाशांना देखील चांगली सुविधा मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेची सुरुवात शताब्दी आणि राजधानी या रेल्वे पासून होणार आहे. रेल्वेमंत्रालयाच्या मते रेल्वेचे खासगीकरण झाल्यास प्रवाशांची सुविधा वाढतील, मोदी सरकारच्या सत्तेत आल्यानंतर प्लॅनमध्ये प्रिमियम रेल्वेचे परमिट देण्याची योजना सहभागी करण्यात आली आहे.

टेंडर प्रक्रियेद्वारे निवड –

खासगी कंपन्यांची निवड टेंडर प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. रेल्वे मंत्रालय या कंपन्यांना परमिट जारी करेल. असे असले तरी रेल्वेचे डब्बे आणि इंजिनची जबाबदारी रेल्वेची असेल, परंतू स्टाफ बरोबरच सुविधांची जबाबदारी खासगी कंपन्यांची असेल.

तिकिटाची रक्कम रेल्वेच ठरवणार –

रेल्वे बोर्ड योजनेसाठी मसुदा तयार करत आहे. तिकीटाच्या रक्कम रेल्वे ठरवेल, कंपनी ठरलेल्या भाड्यापेक्षा अधिक वसुली करु शकत नाही.

सिनेजगत

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला शाहिद कपूरसोबत ‘रात्र’ घालवायचीय !

 ‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन  

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com) 

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी