चावी विसरल्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या खोलीत थांबला प्रियकर, केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्काराच्या घटनेनंतर २१ वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराला तुरुंगात नेण्याची कहाणी शेअर केली आहे. तिचा प्रियकर तीच्या घरासमोर राहत होता. एक दिवस प्रियकराने सांगितले की तो आपल्या घराची चावी विसरला आहे आणि त्याचे पालक त्याच्या कॉल घेत नाहीत. यानंतर तो मुलीच्या घरीच राहिला.

ब्रिटीश मुलगी म्हणते की तिने मुलाला स्पष्ट सांगितले होते की तिची तब्येत ठीक नाही आणि ते लैंगिक संबंध ठेऊ शकत नाहीत. पण जेव्हा ती जागी झाली, तेव्हा तिने स्वत:ला नग्न अवस्थेत पाहिले.

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर जेव्हा मुलगी जागी झाली तेव्हा ती ओरडली. २३ वर्षांचा मुलगा हेडन पैथनने घडलेली घटना सांगतली. हेडन ग्राहक सेवा सल्लागार म्हणून कंपनीत काम करत होता. मुलगी हेअर ड्रेसर म्हणून काम करायची. घटनेनंतर मुलगी आपल्या मित्राला किंवा कुटूंबाला बराच काळ तिच्यासोबत घडलेली घटना सांगू शकली नाही.

यानंतर मुलीने प्रियकर जेव्हा तिला घडलेली घटना सांगत होता तेव्हा छुप्या पद्धतीने रेकॉर्ड केली ज्यामध्ये तो बलात्काराची कबुली देत आहे. नंतर, जेव्हा मुलगी या प्रकरणी तक्रार देण्यासाठी गेली, तेव्हा पोलिसांनी टेपचा एक चांगला पुरावा म्हणून नोंद घेतली.

हेडनने न्यूकॅसल क्राउन कोर्टात गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ४ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचे नाव लैंगिक गुन्हेगाराच्या रजिस्टरमध्ये लिहिण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/