पाकिस्तानच्या खेळाडूचे ‘पीएसएल’ पेक्षा ‘आयपीएल’वरच प्रेम ; पहा व्हीडिओ

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – सध्या भारतात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तसंच आयपीएलची हवाही भारतात फिरत आहे. ही हवा फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही आहे. आयपीएलचे चाहते पाकिस्तानातही आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. त्यामुळे त्याचे प्रमोशन पाकिस्तानी खेळाडू करत आहेत. मात्र आयपीएल ते विसरलेले नाहीत. आजही आयपीएल त्यांच्या मनात आहे, याची प्रचती आली आहे.

पाकिस्तानी खेळाडू सामन्यात किंवा सामन्याबाहेर अनेक चुका करत असतात. त्या चुका कधी कधी मजेशीरही असतात. अशीच एक मजेशीर चुक पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमलने केली आहे. त्याने केलेल्या या चुकीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाकिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या सुपर लीगचे प्रमोश करतानाचा हा व्हीडिओ आहे.

सुपर लीगचे सोशल मीडियावर प्रमोशन करताना उमर अकमल पीएसएल ऐवजी आयपीएल असं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे उमरची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आपल्याकडून झालेली चूक लक्षात येताच अकमलने आपली चूक दुरुस्त केली. पण तेव्हापर्यंत फार उशीर झाला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

साहजिकपणे क्वेटाची टीम कराचीत दाखल झाली आहे. कराची आमचे होमग्राऊंड आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते आम्हाला ज्या प्रमाणात खेळण्यासाठी प्रोत्साहन देतील, तेवढीच चांगली खेळी आम्हाला करता येईल. तसेच या स्पर्धेतील इतर टीमना अशाच प्रकारे प्रोत्साहन मिळाले तर, ती वेळ दुर नाही की पुढील आयपीलचे माफ करा, पीएसलचे आयोजन कराचीत होईल.’ असे उमर अकमल व्हिडीओत म्हणाला आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानच्या काही खेळाडूंना सहभागी करण्यात आले होते. परंतू भारत पाकिस्तानमधील वाढत्या कुरापतींमुळे भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर बंदी टाकण्यात आली आहे. तरी देखील पाकिस्तानचे आयपीएल वरील असलेले प्रेम कमी झालेले दिसत नाही, याची प्रचीती आली आहे.

ह्याहि बातम्या वाचा-

परभणी लोकसभेसाठी खासदार संजय जाधव यांची उमेदवारी निश्चित ?

प्रसिध्‍द तेलुगु अभिनेता अली यांचा ‘या’ पक्षातून राजकारणात प्रवेश

फेसबुकवर जुळल्यानंतर उच्चशिक्षित तरुणीशी झेंगाट लग्नाला नकार दिल्याने तरुणीची पोलिसांत धाव

मोदींची काश्मीरनीती अपयशी ; म्हणूनच विधानसभा निवडणुका नाही

‘राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी’