पुलवामा हल्ल्याप्रकरणी एनआयएचे वर्ध्यासह चार ठिकाणी छापे

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – पुलवामा हल्ला प्रकरणी एनआयएने राज्यातील वर्धा तसेच हैदराबाद येथील ३ अशा ४ ठिकाणी छापे मारले आहेत. वर्धा येथून एका महिलेला अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलवामा येथे जवानांच्या वाहनांवर हल्ला प्रकरणात ४० जवान शहीद झाले होते.

या घटनेनंतर पं. बंगालमधील दोघांजवळ सीआरपीएफच्या जवानांच्या नेमणूकीसंबंधातील कागदपत्रे सापडली होती. या दोघांचे बांगला देशातील बंदी असलेल्या अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी पुण्यातूनही दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांकडे चौकशी केल्यानंतर एनआयए आणि त्या राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने वर्धा आणि हैदराबाद येथे छापेमारी करुन काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा आयएसआयशी संबंध असल्याचा संशय आले.

वर्धा येथून एका महिलेला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.