अभिनेत्री निया शर्माचा ‘जलवा’, शेअर केले ‘मोनोक्रोम’ फोटोज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  टीव्ही अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे अनेक बिकीनीतले हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा नियानं सोशलवर कहर केला आहे.

नियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की हे मोनोक्रोम फोटो आहेत. नियाचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत. चाहत्यांना तिचा बोल्ड अवतार खूप आवडत असतो. नियाचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहेत.

नियाचे फोटो पाहून वाटत आहे की, नुकतीच ती स्विमिंगपूलमध्ये किंवा बीचवरून अंघोळ करून आली आहे. तिचा स्मोकी मेकअप खूप सुंदर वाटत आहे. तिचा चेहरा आणि केस ओलेच दिसत आहेत.

चाहत्यांसोबतच स्टार्सही तिचं कौतुक करत आहेत. रवी दुबे, कुशल टंडन, सायंतनी घोष, रूबीना दिलैक, विजेंद्र कुमेरिया अशा अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

View this post on Instagram

White Lies

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

View this post on Instagram

Silently talking

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

View this post on Instagram

Walking on my own is all I ever wanted!

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

View this post on Instagram

@rehmansiledar

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

View this post on Instagram

🌴 🌅

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

View this post on Instagram

Embrace all that is you! #2020goals

A post shared by Nia Sharma (@niasharma90) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like