निगडी पोलिसांकडून वेगवेगळे २१ गुन्हे उघडकीस

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

निगडी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्हयात १० गुन्हेगारांना अटक करुन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २० आणि पुणे पोलीस आयुक्तालयातील एक असे २१ गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून सहा लाख १६ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

जाहीरात

रवी नरसप्पा रेड्डी (२२, रा. सुदर्शननगर, आकुर्डी) शक्तिकेश शिवकुमार प्रजापती (१८, रा. चिंचवड), अरबाज रियाज पठाण (१९), विशाल कमलाकर डोंगरे (१९, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) यांना अटक करत एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच प्रेम प्रकरणातून खून करुन त्याचा पुरावा नष्ट करणारे धन पठाणी कामी (४२, रा. चिखली), खेमराज राणा कामी (२५, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. नेपाळ) तसेच त्यांची साथीदार पूजा रामसिंग ढकलवार (२५, रा. चिखली) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

जाहीरात

सराईत आरोपी साजन मन्नू मेहरा (२५, रा. देहुरोड) याला पोलिसांनी दोन पिस्तूल व सहा जिवंत काडतूस तसेच एक स्टील प्लेटींग मॅग्झिनसह अटक केले. साजन याच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपींसह पोलिसांनी लॅपटॉप चोरी प्रकरणातील आनंद त्र्यबंक इंदुकाने (२२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यालाही अटक केली आहे.

महानगरपालिकेच्या तोतया सुरक्षा रक्षकास अटक

या तपासामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील १२, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन, वाकड, खडक, सांगवी आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

[amazon_link asins=’B01MCUSD3L,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc00ecf4-b31e-11e8-afdc-5d906af65ac4′]