जुळ्या मुलांची राजधानी आहे ‘हे’ शहर, कारण जाणून वैज्ञानिक देखील झाले ‘हैराण-परेशान’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नायजेरियाच्या इग्बो-ओरा शहराला जगभरात जुळ्या मुलांच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी जुळ्या मुलांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये सामील होण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी येतात. असे सांगण्यात येते की या ठिकाणी सर्वात जास्त जुळी मुले जन्माला येतात.

नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार अमेरिकेत जन्म घेणाऱ्या एक हजार मुलांपैकी 33 मुले जुळी असतात. त्या मानाने इग्बो – ओरा शहरात हा आकडा 50 जुळ्या मुलांचा आहे.

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, जुन्या काळात जुळ्या मुलांचा जन्म होणे म्हणजे अशुभ मानले जात होते. मात्र आजच्या काळात हा विचार बदललेला आहे आणि लोक याला आशीर्वाद मानत आहेत. शास्त्रज्ञांचे सुद्धा हेच मत आहे की आतापर्यंत हे कळू शकलेले नाही की याच ठिकाणी जास्त जुळी मुले जन्माला कशी येतात.

हे असू शकते कारण
स्थानिक लोकांच्या मते याचे एक कारण महिलांचा आहार हे सुद्धा असू शकते. तसेच स्थानिक नेते सैमुअल अदेयुवी अडेले यांनी सुद्धा याला पुरुषांचा आहार देखील कारणीभूत असू शकतो असे सांगितले आहे. कारण येथील पुरुष आहारामध्ये याम नावाचा पदार्थ खातात.

याम या खाद्यपदार्थात प्रजनन क्षमता जास्त असते असे देखील मानले जाते. मात्र तज्ञ लोक या गोष्टी आजिबात मानत नाहीत. त्यांच्या नुसार जुळी मुले जन्माला येणे यामागे काही आनुवंशिक कारणे असतात.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या