ताज्या बातम्यामनोरंजन

Nikki Tamboli | लवकरच निक्की तांबोळी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार मोठ्या पडद्यावर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Nikki Tamboli | निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमानंतर निक्की चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आली. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

 

 

निक्की लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. बिग बॉस 14 मधून बाहेर आल्यानंतर निक्कीला अनेक चित्रपटांसाठी ऑफर आली होती. मात्र नुकतंच तिनं बॉलिवूडमधील एक चित्रपट साईन केलं असल्याचं कळतंय. तसेच निक्कीसोबत तिच्या या आगामी चित्रपटात काही दिग्गज कलाकार सुद्धा दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाचे शूटिंग चालू झालं असून, ती आपल्या पात्रासाठी भरपूर मेहनत करत आहे.

 

 

 

दरम्यान, निक्कीनं या चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
याआधी तिनं तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 2019 मध्ये निक्की ‘कंचना 3 (Kanchana 3)’ मध्ये दिसली.
याव्यतिरिक्त तिनं दोन तेलुगु चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

 

https://www.instagram.com/p/CWSXX8VNiVj/?utm_source=ig_web_copy_link

 

Web Title :- Nikki Tamboli | bigg boss 14 fame nikki tamboli is all set to make her bollywood debut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button