भावाचं कोरोनाने निधन झाल्यानंतर निक्की तंबोली लगेच दक्षिण आफ्रिकेला, ट्रोलर्सच्या निशाण्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘बिग बॉस’ फेम निक्की तंबोली सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याचं कारण आहे तिचं दक्षिण आफ्रिकेला जाणं. निक्कीचा भाऊ जतीन तंबोलीचे 4 मेला 29 व्या वर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाले. जतीनच्या जाण्याने कुटुंबिय मोठ्या दु:खात आहेत. त्यातच निक्की परदेशात जात असल्याने आता तिला ट्रोल केले जात आहे.

‘खतरों के खिलाडी’ शोच्या अकराव्या भागात सहभागी होण्यासाठी निक्की तंबोली दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. निक्कीने सोशल मीडियावर तिच्यासोबतच्या कलाकारांचेही काही फोटोज आणि एन्जॉय करतानाचे व्हिडिओ शेअर केले. त्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे. नुकतचे भावाचे निधन झाले आहे. तू मजा करत आहेस? असा सवाल काही नेटीझन्सने केला.

त्यानंतर निक्कीनेही त्यांना सडतोड उत्तर दिले. त्यावर ती म्हणाली, ‘माझ्या फोटोवर कमेंट करत आहेत की माझ्या भावाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तुला लाज वाटत नाही, तू मजा करतेस? अशा मूर्खांना मी सांगू इच्छिते, की माझे पण स्वत:च आयुष्य आहे. मलादेखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे, माझ्यासाठी नव्हे तर माझ्या भावासाठी ज्याला मला आनंदी पाहून कायम समाधान वाटायचे आणि हे लोक ज्यांच्याकडे काही काम नाही जे फक्त कमेंट करणे आणि नकारात्मकता पसरवण्याचे काम करतात’.

तसेच ती पुढे म्हणाली, ‘अशा लोकांना माझी विनंती आहे, की ‘जा तुमची स्वप्न पूर्ण करा. यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या जीवलगांना आनंद होईल. ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणे ही माझ्या भावाची इच्छा होती, असेही तिने म्हटले.