‘ते’ सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील : नीलेश राणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना भाजप युती होणार का याबद्दलच्या चर्चा दिवसेंदिवस वाढताहेत पण यावर अजूनही दोन्ही पक्षातील वरिष्ठांपैकी एकाने सुद्धा ठोस निर्णय घेतल्याचं दिसत नाही. बहुदा भाजप युती साठी आग्रही असल्याचे दिसून येते. यासाठीच मंगळवारी राजकीय रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना मातोश्री वर एका गुप्त बैठकीसाठी बोलवले होते, यावेळी पक्षाचे सर्व खासदार ही उपस्थित होते. यावर नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी  ‘सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लाऊन फिरतील, अशी घणाघाती टीका शिवसेनेवर केली आहे.
ट्विटच्या च्या माध्यमातून नीलेश राणेंची टीका
प्रशांत किशोर यांचा २०१४ मध्ये भाजपची निवडणूक रणनीती आखण्यामध्ये सहभाग होता. प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विट केले आहे. नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की,’… आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा.’ दरम्यान राणे -ठाकरे वाद पुन्हा भडकतोय की हे फक्त निवडणुकीपुरते मनोरंजन आहे. हे कळेनासे झाले आहे.
https://support.twitter.com/articles/20175256
प्रशांत किशोर यांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला
उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या सभेत ‘चाैकीदार चाेर है’ अशी टीका केली हाेती, त्या वक्तव्यामुळे मोदी नाराज झाल्याचे प्रशांत किशाेर यांनी ठाकरेंना या भेटीत सांगितले. तसेच युती करायची असल्याने यापुढे तुम्ही अशी वक्तव्ये टाळावीत, असा सल्लाही प्रशांत यांनी ठाकरेंना दिला. प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा सर्व्हे केला आहे. त्या आधारे  शिवसेनेला स्वबळावर लढल्यास किती जागा मिळू शकतील, याबाबतही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत स्वबळापेक्षा युतीच फायद्याची. असा निष्कर्ष काढणारा अहवालही त्यांनी ठाकरेंना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.