निर्भया केस : ‘सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत न्याय मिळवण्याचा हक्क’, न्यायालयानं असं सांगितल्यानंतर ‘ढसा-ढसा’ रडली निर्भयाची आई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया केसमधील दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केल्यानंतर देखील पटियाला हाऊस न्यायालयात याबाबतची सुनावणी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सुनावणीवेळी निर्भयाच्या आईचा बांध फुटला आणि न्यायालयातच आई आशादेवी रडू लागल्या आणि म्हणाल्या, माझ्या अधिकारांचं काय ? मी देखील माणूस आहे. सात वर्ष झाली, मी न्यायासाठी हात जोडते, कृपया दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी करा अशी मागणी निर्भयाच्या आईने कोर्टात केली.

निर्भयाचे वडील म्हणतात, मुलीसोबत अन्याय होत आहे
निर्भयाच्या वडिलांनी भावून होऊन न्यायालयात सांगितले की, निर्भयावर अन्याय होत आहे. जेल अधिकाऱ्यांनी खालच्या कोर्टात एक रिपोर्ट सादर करून म्हटले होते की, कोणत्याही दोषीने गेल्या सात दिवसामध्ये दिलेल्या कालावधीमध्ये कोणत्याही सरकारी पर्यायाचा अवलंब केलेला नाही. या चारही दोषींमध्ये मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय कुमार यांच्या नावाचा समावेश आहे.

काय झाले होते त्या दिवशी
डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सिंगापुरला नेण्यात आले होते. तिचा 29 2012 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत सहा आरोपी होते त्यातील एक अल्पवयीन असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली. तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.