‘अभाविप’ व ‘विकासार्थ विद्यार्थी कार्य’ यांच्या वतीने राबवण्यात आले ‘गणेश मूर्ती’ आणि ‘निर्माल्य संकलन’ अभियान

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अभाविप व विकासार्थ विद्यार्थी कार्य यांच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन अभियान गरवारे महाविद्यालया जवळील घाटावर करण्यात आले. अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची आपण मनोभावे सेवा करतोआणि शेवटचा दिवस येतो तो अनंत चतुर्दशीचा.

अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनावेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. या गणेशोत्सवामध्ये आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आपल्या घरी बसवतो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे नदी मध्ये विसर्जन करतो. परंतु यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होऊन निसर्गाची हानी होते, हे रोखण्यासाठी विकासार्थ विद्यार्थी व अभाविप पुणे तर्फे ह्या वर्षी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन अभियान करण्यात आले.

ADV

यावेळी पुणेकरांना गणेश मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात न करता हौदात करावे व निर्माल्य देखील नदीपात्रात न टाकता संकलित करावे असे आवाहन अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे व विकासार्थ विद्यार्थी कार्य संयोजक सिदार्थ गिरमे ह्यांनी निर्माल्य दान अभियान दरम्यान केले.