Nitesh Rane | महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी होता? भावी महिला मुख्यमंत्री की… – नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा शनिवारी मुंबईत महामोर्चा संपन्न झाला. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते, पदाधिकारी, महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते आदी लोक मोर्चाला उपस्थित होते. या मोर्चाला लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर विरोधी पक्षांनी एकप्रकारे शक्ती प्रदर्शन या मोर्चातून केले. आता या मोर्चावर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री समोर आणण्यासाठी होता, की महाराष्ट्र हितासाठी होता, असा प्रश्न नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा, सीमाप्रश्न, बेकारी, भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांची बेताल विधाने, रखडलेली कामे आदी मागण्या आणि प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, उपनेत्या सुषमा अंधारे, रश्मी ठाकरे आदी नेते आणि महाविकास आघाडीतील अनेक आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. भायखळाच्या राणीबाग (जिजामाता भोसले उद्यान) येथून हा मोर्चा सुरू झाला आणि महानगरपालिकेजवळ येऊन सभेने मोर्चाची सांगता झाली.

यावेळी विविध नेत्यांची भाषणे झाली. संजय राऊत यांनी हे सरकार फेब्रुवारी महिना पाहू शकणार नाही, असे म्हटले.
अजित पवारांनी सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे कान टोचले.
शरद पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना खडे बोल सुनावले.
विविध मुद्यांवर विविध नेत्यांनी भाष्य केले. या मोर्चाची दखल सत्ताधारी पक्षाने घेतली असून भाजपकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला नॅनो शिवसेनेचा नॅनो मोर्चा म्हटले आहे.
तर नितेश राणे यांनी मोर्चाचा हेतूच काय होता असा प्रश्न केला आहे.

 

Nitesh Rane | bjp mla nitesh rane raised question whether purpose mva grand march
bring forward a future woman cm the benefit of maharashtra

 

Web Title :- Pune Pimpri Crime | FIR against 20-year-old girl for forcing sexual
intercourse with minor; Shocking incident in Chakan area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा