युती म्हणजे सत्तेसाठी ‘नंगा नाच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेना भाजप युती वरून दोन्ही पक्षांना विरोधकांकडून घेरणे अद्याप हि सुरूच आहे. अशातच आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत सुरु असणाऱ्या वादाला लक्ष केले आहे. त्यांनी सेना भाजप युतीला सत्तेसाठी नंगा नाच असे आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजप शिवसेनेच्या युतीच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. नाणार प्रकल्प रद्द झाला नाही. बेस्टच्या कामगारांचा प्रश्न सुटला नाही, असे जनतेचे प्रश्न सुटले नसताना यांना मुख्यमंत्री पद कशासाठी हवे आहे असे नितेश राणेंनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे. एवढेच बोलून राणे थांबले नाहीत तर त्यांनी युतीला सत्तेसाठी नंगा नाच असे देखील संबोधले आहे.

सेना भाजप युतीच्या घोषणे नंतर लगेच मुख्यमंत्री पदाचा वाद रामदास कदम यांनी छेडला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमात स्पष्टीकरण दिले कि मुख्यमंत्री पदा बाबत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेत मुख्यमंत्री पदा बाबत जी बोलणी झाली त्याबद्दल रामदास कदम यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुखाकडून माहिती घ्यावी आणि नंतर माध्यमात प्रतिक्रिया द्यावी असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अशा वाद प्रतिवादात शिवसेना भाजप मधील विस्तव अद्याप पूर्णपणे विजला नाही असे यावरून स्पष्ट होते. म्हणूनच या सुक्ष वादाची विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून खिल्ली उडवली जाते आहे.

Loading...
You might also like