नामांतरावरून नितेश राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचलं, म्हणाले….

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन –  नामांतराच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते  नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश आणि नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. नामांतरासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि मनसेकडून नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचे काम केले जात आहे. आता याच मुद्यावरुन नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

rane
rane

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेला लक्ष करताना नितेश राणे म्हणाले की, मर्द  असाल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करुन दाखवा. नाहीतर तुम्हाला काय सर्टिफिकेट द्यायचं ते आम्ही देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या महाविकास आघाडीतील स्थानाबद्दल त्यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघीडीमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काडीचीही किंमत देत नाही, असा टोला राणे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या – निलेश राणे

नितेश राणे यांच्यानंतर निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज आम्हाला माफ करा. तुमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या नीच औलादी जन्माला आल्या ह्या पेक्षा मोठं दुर्भाग्य काही नाही. ज्या संभाजी महाराजांनी स्वत:च आयुष्य स्वराज्यासाठी संपवलं त्यांचा आपण रोज अपमान करतोय हे देखील शिवसेनेला भान नाही, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही – मनसे

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेला डिवचताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, जोपर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही, तोपर्यंत औरंगाबादचे नामांतर करु शकणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागणार आहे. मात्र, काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. आता राज्य सरकारने विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र विमानतळाचं नाव कसलं बदलता आधि शहराचं नाव बदलून दाखवा, असे आव्हान देशपांडे यांनी देले आहे.