Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी शिवप्रताप दिन राज्यभरात साजरा करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीभोवती जे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते, ते देखील हटविण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government) दिले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी शिवप्रताप दिनानिमित्त भाजपतर्फे (BJP) मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केले. नितेश राणे यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

राज्यातील सर्व शिवप्रेमींची इच्छा होती की, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीच्या बाजुला असेलेले अतिक्रमण हटविले पाहिजे. ते हिंदुत्ववादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने आदेश देऊन हटविले आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आहोत. त्यामुळे जे इतिहासामध्ये कोणालाही जमले नाही, कोणाचीही हिम्मत झाली नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखविले. तसेच स्वत: ला हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणतात, त्यांनी हे काम आपल्या सरकारमध्ये केले नाही. हातात भगवा घेतला म्हणुन कोणी हिंदुत्ववादी होत नाही, असे नितेश राणे (Nitesh Rane) यावेळी म्हणाले.

इतिहासामध्ये या घटनेची नोंद होईल. असा क्षण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
या सरकारने आम्हाला अनुभवायला दिला आहे. आतापर्यंत जे राज्यकर्ते होते त्यांनी अफझल खानावर प्रेम केले होते.
त्यामुळे मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असणे हे खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी दाखवुन दिले
असल्याचे देखील नितेश राणे यावेळी म्हणाले आहेत.

Web Title :-  Nitesh Rane | Taking saffron in hand does not make one a Hindu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update