Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीतल्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये चाकणकर यांनी, ‘लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही’ असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) खाली अनेक विरोधी मतांच्या लोकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण, यापैकी अनेक प्रतिक्रिया अर्वाच्य, अश्लील भाषेत आहेत. त्यापैकी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या बार्शीतल्या (Barshi) युवकाला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या फेसबुक पोस्टवर बार्शी मधील युवराज ढगे (Yuvraj Dhage) नावाच्या तरूणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे (Suvarna Shivpure) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात (Barshi City Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी युवराज ढगे या तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध आयपीसी 1860 नुसार कलम 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 67 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

दरम्यान, नुकतंच शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramba Kulkarni) यांनी रूपाली चाकणकर यांनाच पत्र लिहून त्यांच्याबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्या संदर्भात तक्रार केली आहे.
फेसबुकवर त्यांनी हे पत्र लिहित आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरूणावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
यानंतर बार्शीतल्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली. तसेच, “समाज माध्यमांचा वापर जपून करावा,
आक्षेपार्ह पोस्ट अथवा कमेंट करू नयेत, तसेच महिलांच्या बाबतीत विशेष जबाबदारी घ्यावी.” असं अवाहन बार्शी पोलिसांकडून (Barshi Police) करण्यात आलं आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | rupali chakankar facebook post barshi city police arrest one young from barshi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Food | मधुमेहाच्या रोग्यांसाठी काळ्या हरभर्‍याचे पाणी आहे वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

 

LIC Children Money Bank Plan | मुलांच्या शिक्षणाचे राहणार नाही टेन्शन ! रोज जमा करा केवळ 150 रुपये, बनवा 19 लाखाचा फंड

 

Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन